Human Rights Day : १० डिसेंबर – मानव अधिकार दिन का साजरा केला जातो?

514
Human Rights Day : १० डिसेंबर - मानव अधिकार दिन का साजरा केला जातो?
Human Rights Day : १० डिसेंबर - मानव अधिकार दिन का साजरा केला जातो?

मानव अधिकार दिन जगभरात दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा केला जातो. १९४८ मध्ये प्रथमच संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी १० डिसेंबर रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. (Human Rights Day) संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत ४ डिसेंबर १९५० रोजी अधिकृतपणे मानव अधिकारदिनाची स्थापना करण्यात आली.

मानवी अधिकारात सर्वात मोठा अडथळा म्हणजे गरीबी. गरीबी दूर झाल्याशिवाय आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्याशिवाय मानवी हक्क रुजणार नाही. हा दिवस पाळला जातो, कारण की शोषित समाजातील लोकांना त्यांच्या मानवी हक्काची जाणीव व्हावी आणि त्यांचे जीवन सुयोग्य व्हावे. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीचा जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य, समानता आणि आदर हा मानवी हक्कांतर्गत येतो, परंतु बहुतेक लोकांना या अधिकारांची (Human Rights Day) माहिती नसते. त्यांना या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी देखील मानव अधिकार दिनाचे आयोजन केले जाते.

(हेही वाचा-Chhagan Bhujbal : मराठा समाजाला दिले ते सर्व ओबीसींना द्या)

बोलण्याचे स्वातंत्र, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा अधिकार, आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार, रंग, वंश, भाषा, धर्म या आधारावर समानतेचा अधिकार, कायद्यासमोर समानतेचा अधिकार, कायद्यासमोर आपली भूमिका मांडण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार – हे अधिकार आपल्याला प्रदान करण्यात आलेले आहेत. जर या अधिकारांवर गदा आणली जात असेल तर त्याविरोधात आपण आवाज उठवला पाहिजे.

भारत सरकारने १२ ऑक्टोबर १९९३ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केली आणि हा कायदा २८ सप्टेंबर १९९३ पासून लागू झाला. नागरी आणि राजकीय हक्कांसोबतच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कही आयोगाच्या अंतर्गत येतात. मानवी अधिकारांवर चर्चा करण्यासाठी राजकीय परिषदा, बैठका, प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, वादविवाद आणि बरेच कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा केला जातात. अनेक सरकारी नागरी आणि गैर-सरकारी संस्था मानवी हक्क कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.