मानव-वन्यप्राणी संघर्ष : केंद्र सरकारने जारी केली १४ मार्गदर्शक तत्वे

101

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्री भुपेंद्र यादव यांनी मानव-वन्यजीव यांच्यामधील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने १४ मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. भारतात मानव-वन्यजीव यामधील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने करण्याच्या परिणामकारक आणि सक्षम उपाय कोणते याबाबत सर्वांमध्ये सर्वसाधारण धारणा रुजावी, हा यामागील हेतू आहे असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी भारत-जर्मन सहकार्य प्रकल्पांतर्गत ही मार्गदर्शक तत्वे विकसित केली आहेत. सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाने जर्मनीतील आंतरराष्ट्रीय मदत संस्था (Deutsche Gesellschaft fur Internationale Zusannenarbeit (GIZ) GmbH) तसेच कर्नाटक, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे वनविभाग यांनी एकत्रितपणे ही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.

( हेही वाचा : गुढीपाडवा २०२३ : विविधरंगी संस्कृतीची समृद्धता दाखवणारा एक वारसा; राजकीय वर्तुळातील दिग्गजांकडून शुभेच्छा)

सरकारने जारी केलेली ही १४ मार्गदर्शक तत्वे

१० प्रजातीविशेष मार्गदर्शक तत्वे

  • मानव-हत्ती
  • मानव -गवे
  • मानव-चित्ता
  • मानव-साप
  • मानव- मगर
  • मानव -गेंडा
  • मानव -मकैक (लालतोंडी माकड)
  • मानव -रानडुक्कर
  • मानव – अस्वल
  • मानव – नीलगाय
  • मानव – काळवीट

४ सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे

  • भारतातील वने आणि प्रसारमाध्यम क्षेत्र : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने परिणामकारक संवाद
  • व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा या संदर्भात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वे
  • मानव-वन्यजीव संघर्षाशी संबधित परिस्थितीत जमावाचे प्रभावी नियंत्रण
  • मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवल्यास जीवाला धोका पोचवणारी आरोग्यविषयक आणिबाणीची परिस्थिती : यावेळी जीव महत्वाचा ही भूमिका

मानव-वन्यजीव संघर्षाच्या नकारात्मक परिणामांपासून माणसे आणि वन्यजीव या दोघांनाही संरक्षण मिळावे म्हणून त्यांच्या सुसंवादी सहअस्तित्वाच्या आवश्यकतेतून ही तत्वे तयार केली आहेत. ही तत्व तयार करताना विविध संस्थांनी आणि राज्य सरकारांच्या वनविभागांनी केलेल्या सूचनाही विचारात घेतल्या आहेत. समग्र दृष्टीकोन तयार करण्याच्या दृष्टीने ही मार्गदर्शक तत्वे एक आराखडा देतात. ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करताना कृषी, पशुवैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा प्रशासन, ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था, स्वयंसेवी संस्था आणि प्रसारमाध्यमांसह सर्वसमावेशक आणि एकात्मिक दृष्टिकोनाचा वापर करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.