BS IV इंजिनाची शेकडो वाहने विकणारी टोळी गजाआड! 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देशभरातील BS IV प्रकारचे इंजिन असलेल्या वाहनांवर बंदी आणण्यात आली आहे. त्यांच्या नोंदणी आणि विक्री करण्यावरही बंदी आहे.   

सरकारने बंदी आणलेल्या BS IV इंजिन असलेली वाहने कंपन्यांनी भंगारात काढली, ती वाहने खरेदी करून त्यांचा चेसी नंबर बदलून ती भारतभर विकणारी टोळी नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने गजाआड केली.

७ कोटींची १५१ वाहने जप्त! 

सरकारने बंदी आणलेली BS IV इंजिन असलेली मारुती कंपनीची भंगारात टाकलेली वाहने भंगाराच्याच दरात खरेदी करून त्या वाहनांची बनावट नोंदणी करून ती वाहने भारतभर विविध राज्यांमध्ये विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यासाठी ही टोळी खोट्या नंबर प्लेट किंवा आरटीओने भंगारात काढलेल्या वाहनांचे नंबर प्लेट लावत होती. पोलिसांनी अशा टोळीतील ९ जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून ७ कोटी १५ लाख रुपयांची १५१ वाहने जप्त केली.

(हेही वाचा : मुंबईकरांनो सावधान! विनामास्क कारवाईतून दिवसाला २४ लाख वसूल करण्याचे पोलिसांना दिले टार्गेट!)

पुरात खराब झाल्याचे कारण देत विकली वाहने! 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार देशभरातील BS IV प्रकारचे इंजिन असलेल्या वाहनावर बंदी आणण्यात आली आहे. त्यांच्या नोंदणी आणि विक्रीलाही बंदी आहे. म्हणून मारुती कंपनीने काही वाहनांचा लिलाव केला होता तर काही वाहने भंगारात विकली होती. त्यानंतर ऑटोमोटिव्ह मॅनुफॅक्चर्स प्रा. लि. कंपनीने ४०७ वाहने खरेदी केली होती. ती वाहने भंगारात काढण्यात आली होती. या कंपनीच्या मालकाने ही वाहने भंगारात न काढता काही साथीदारांच्या साहाय्याने या वाहनांचा चेसी नंबर बदलून खोटी कागदपत्रे बनवून हिमाचल प्रदेशमध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर या आरोपींनी महाराष्ट्रात पूर आल्याने त्यात ती वाहने खराब झाली होती, त्यामुळे आम्ही ही वाहने कमी किमतीत विकत आहोत, असे कारण देत ही वाहने विकत होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी ९ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १५१ वाहने जप्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here