-
ऋजुता लुकतुके
बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खानने (Shah Rukh Khan) प्रथमच देशातील श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. हुरून इंडियाची श्रीमंतांची यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये या दोघांचाही समावेश आहे. या यादीत म्हटल्याप्रमाणे शाहरुख खानची एकूण संपत्ती ७,३०० कोटी रुपये इतकी आहे. (Hurun India Rich List)
शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील भागीदारीमुळे या यादीत आपले स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन, जुही चावला आणि कुटुंब, करण जोहर आणि हृतिक रोशन यांचाही पहिल्यांदाच हुरून इंडिया रिच लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. (Hurun India Rich List)
(हेही वाचा – Sharad Pawar यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली; केंद्राच्या निर्णयाबद्दल घेतली शंका)
हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट आणि चित्रपट हे भारतातील महत्वाची दोन क्षेत्र आहेत. आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्समधील होल्डिंग व्हॅल्यूमुळे चित्रपट स्टार शाहरुख खानचा पहिल्यांदाच हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये समावेश करण्यात आल्याचे ते म्हणाले. मनोरंजन उद्योगातील सात लोकांनी, ज्यांना पहिल्यांदाच हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये (Hurun India Rich List) समाविष्ट केले आहे, त्यांनी एका वर्षात ४०,५०० कोटी रुपयांची संपत्ती जोडली आहे.
हुरून श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत. आणि त्यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून हे स्थान मिळवलं आहे. अदानी आणि अंबानींच्या खालोखाल या यादीत शिव नादर, आदर पुनावाला, दिलीप संघवी, गोपीचंद हिंदुजा व राधाकिशन दमानी यांचा समावेश आहे.
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=G5Ct-0hyKH4
Join Our WhatsApp Community