चीनच्या बीजिंगला मागे टाकत मुंबई प्रथमच आशियातील सर्वात श्रीमंत राजधानी (Hurun Rich List 2024) बनली आहे. मुंबईत आता बीजिंगपेक्षा जास्त अब्जाधीश आहेत. हुरुन रिसर्चच्या २०२४ च्या जागतिक श्रीमंत यादीनुसार, बीजिंगमधील ९१ च्या तुलनेत मुंबईत ९२ अब्जाधीश आहेत. तर संपूर्ण चीनमध्ये २७१ तर भारतात ८१४ अब्जाधीश आहेत.
(हेही वाचा – CM Pinarayi Vijayan : ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा)
अब्जाधीशांच्या बाबतीत मुंबई तिसऱ्या स्थानावर :
अब्जाधीशांच्या (Hurun Rich List 2024) बाबतीत मुंबई आता न्यूयॉर्कनंतर जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक अब्जाधीश आहेत. येथे ११९ अब्जाधीश राहतात. त्यापाठोपाठ ९७ अब्जाधीश असलेल्या लंडनचा क्रमांक लागतो. तर मुंबई (९२) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबईत किती नवीन अब्जाधीश आहेत?
एकीकडे मुंबईत २६ नवीन अब्जाधीश असून मुंबईने चीनची राजकीय आणि सांस्कृतिक राजधानी बीजिंगला मागे टाकले आहे. तर दुसरीकडे, चीनच्या बीजिंगमध्ये अब्जाधीशांची घट झाली आहे. (Hurun Rich List 2024)
(हेही वाचा – Navneet Rana : अमरावतीसाठी भाजपाचा प्लान बी तयार; नव्या उमेदवारांची चाचपणी सुरु)
मुंबईच्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती ४४५ अब्ज डॉलर्स :
मुंबईच्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती ४४५ अब्ज डॉलर्स आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, बीजिंगच्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती २६५ अब्ज डॉलर्स आहे, जी २८ टक्क्यांनी कमी झाली आहे. (Hurun Rich List 2024)
India’s rise as an economic powerhouse is affirmed by the latest 2024 Hurun Global Rich List. Today, Hurun India unveils the thirteenth edition of the Hurun Global Rich List, offering insights into the rankings of US-Dollar billionaires in India. pic.twitter.com/uzNNXVzyTO
— HURUN INDIA (@HurunReportInd) March 26, 2024
संपत्ती क्षेत्रांमध्ये ऊर्जा आणि औषधनिर्माण क्षेत्रांचा समावेश :
मुंबईच्या संपत्ती क्षेत्रांमध्ये ऊर्जा आणि औषधनिर्माण क्षेत्रांचा समावेश आहे, ज्यात मुकेश अंबानी यांच्यासारख्या अब्जाधीशांचा समावेश आहे. स्थावर मालमत्ता व्यावसायिक मंगल प्रभात लोढा (आणि कुटुंब) यांना सर्वाधिक संपत्ती मिळाली आहे. (Hurun Rich List 2024)
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीचा आयपीएलमध्ये अनोख विक्रम )
ग्लोबल रिच लिस्टनुसार,
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली असून ते सध्या १० व्या स्थानावर आहेत, ज्याचे श्रेय प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीजला जाते. त्याचप्रमाणे गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने ते जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर पोहोचले आहेत. एच. सी. एल. चे शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्ती आणि जागतिक क्रमवारीत सुधारणा झाली असून ते ३४ व्या स्थानावर पोहोचले आहेत. (Hurun Rich List 2024)
काही भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत किंचित घट :
काही भारतीय अब्जाधीशांच्या जागतिक श्रीमंत यादीत त्यांच्या जागतिक क्रमवारीत किंचित घट झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या सायरस एस. पूनावाला यांची निव्वळ संपत्ती किरकोळ (नऊ स्थानांनी घसरून ५५ व्या स्थानावर) घसरून ८२ अब्ज डॉलर्सवर आली. भारतातील अब्जाधीशांच्या गटात सन फार्मास्युटिकल्सचे दिलीप संघवी (६१वे) आणि कुमार मंगलम बिर्ला (१००वे) यांचा समावेश आहे. तर राधाकिशन दमानी आठ स्थानांनी वर जाऊन १०० व्या स्थानावर पोहोचले आहे. (Hurun Rich List 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community