‘आयफोनसाठी कायपण’… थेट बायकोलाच लावले पणाला! वाचा काय झाले पुढे

त्यानंतर लग्नाच्या पंधरा दिवसांनंतर राजेश आपल्या पत्नीला राजस्थानला एका ठिकाणी फिरण्यासाठी घेऊन गेला, जिथे त्याने...

नवीन आयफोन विकत घेण्यासाठी लोकांना आपली किडनी विकावी लागणे यांसारख्या हास्यास्पद गोष्टी आपण ऐकल्याच आहेत. पण ओडिशात यापेक्षाही धक्कादायक आणि निंदनीय प्रकार घडला आहे. ‘आयफोनसाठी कायपण’ म्हणत, एका 17 वर्षांच्या बालिश तरुणाने आपल्या पत्नीलाच पणाला लावले आहे. त्याने आपल्या 26 वर्षीय पत्नीला 1 लाख 80 हजार रुपयांना विकल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

काय केले नेमके?

सुलेकेला गावातील राजेश राणा या 17 वर्षीय किशोरवयीन तरुणासोबत जवळच्याच गावात राहणाऱ्या एका 26 वर्षीय मुलीने काही महिन्यांपासून असलेल्या त्यांच्या प्रेमसंबंधानंतर लग्न केले होते. त्यानंतर लग्नाच्या पंधरा दिवसांनंतर राजेश आपल्या पत्नीला राजस्थानला एका ठिकाणी फिरण्यासाठी घेऊन गेला, जिथे त्याने तिला 55 वर्षांच्या एका राजस्थानी व्यक्तीला 1 लाख 80 हजार रुपयांना विकले. 5 ऑगस्ट रोजी महिलेच्या वडिलांनी बेलपाडा पोलिस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांचा तिच्याशी कोणताच संपर्क होत नसल्याने त्यांनी ही तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे, बेलपाडा पोलिसांनी राजेशला चौकशीसाठी बोलावले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घडलेला प्रकार सांगितला.

(हेही वाचाः पुण्यात भर दुपारी गँगवार : वाळू व्यावसायिकासह २ जणांचा मृत्यू)

बालसुधारगृहात रवानगी

राजेशने पत्नीला विकून मिळालेले पैसे उधळले आणि नंतर स्वतःसाठी एक आयफोन विकत घेतला. नंतर तो त्याच्या गावी परतला आणि जेव्हा त्याच्या पत्नीच्या कुटुंबाने त्याला तिच्याबद्दल विचारले, तेव्हा त्याने सांगितले की तिने त्याला सोडले आहे. या महिलेचा शोध घेण्यासाठी बालंगीर येथील एक पथक राजस्थानला गेले होते. तिथे चौकशी केली असता पोलिसांना त्याच्या पत्नीचा शोध लागला. पण तिथल्या स्थानिकांनी त्यांच्या टीमला तिला पुन्हा माघारी नेण्याची परवानगी दिली नाही. आम्ही तिला मोठ्या कष्टाने घरी परत आणल्याचे पोलिस अधिका-यांनी स्पष्ट केले. या 17 वर्षीय तरुणाला बाल न्यायालयात हजर करुन पुढे त्याला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here