कराटे ट्रेनिंगच्या नावाखाली PFI तयार करत होते दहशतवादी, NIA ने केला पर्दाफाश

टेरर फंडिंग आणि दहशतवादी कारवायांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कारवाई करत आहे. संबंधित प्रकरणामध्ये, एजन्सीने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या सदस्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. एनआयएने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील 23 ठिकाणी छापेमारी केली आहे. या सर्व ठिकाणी एजन्सीचे पथक तपासात गुंतले असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

(हेही वाचा – शिंदे गटाचा भाजपलाही ‘दे धक्का’, मुंबईत 100 पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश)

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने कराटे ट्रेनिंग सेंटरच्या नावाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेकडून प्रशिक्षण शिबिर चालवल्याच्या संदर्भात हा छापा टाकला आहे. एनआयएने कुरनूल, नेल्लोर, कडप्पा, आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि तेलंगणातील निजामाबाद येथील संशयितांच्या घरांची आणि व्यवसायाची झडती घेतली आहे. या सर्व ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती, त्याआधारे छापे टाकण्यात आले आहेत.

एनआयएच्या पथकाने नेल्लोर जिल्ह्यातील बुची येथे इलियास नावाच्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला होता. इलियास गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. येथील खाजा नगरमध्ये तो टिफिनचे दुकान चालवत होता. या छाप्यासाठी एनआयएचे एक पथक रविवारी (18 सप्टेंबर 2022) सकाळी इलियासच्या घरी पोहोचले होते. तेथे त्यांच्या कुटुंबीयांची कडक चौकशी केली. याशिवाय निजामाबादच्या कराटे शिक्षकावरही मोठी कारवाई झाली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) कराटे प्रशिक्षण शिबिराच्या नावाने चालणाऱ्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिराला आर्थिक मदत करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी एनआयएला परदेशी निधीची माहिती मिळाली होती. त्यानंतरच हा छापा टाकण्यात आला. असा दावा केला जात आहे की, पीएफआयद्वारे चालवल्या जाणार्‍या या कराटे प्रशिक्षण केंद्रांच्या नावाने सुरू असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात 150 हून अधिक लोकांना हिंसक कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जात होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here