हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. हैदराबादमधील उच्चभ्रू वस्ती जुलबी हिल्समध्ये एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु
या प्रकरणात तीन ते चार आरोपींचा समावेश असल्याचा प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. तसेच इतर आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे. पीडित मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
( हेही वाचा: रेल्वेची नवी सुविधा: आता तुमचं स्टेशन आल्यावर रेल्वे करणार तुम्हाला ‘वेकअप काॅल’ )
पीडितेची वैद्याकीय तपासणी
बुधवारी जुलबी हिल्स पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या हायप्रोफाईल गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला आहे. ही घटना शनिवारी घडल्याचे समोर येत आहे. प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध भांदवि कलम 376,354,323, 09,10 आणि पाॅक्सो कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 17 वर्षीय पिडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community