World Green City : देशातील ‘या’ शहराला मिळाला वर्ल्ड ग्रीन सिटीचा बहुमान

163

दक्षिण कोरियातील जेजू येथे झालेल्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ हॉर्टिकल्चर प्रोड्युसर्स (एआयपीएच) 2022 मध्ये भारतातील हैदराबाद शहराने वर्ल्ड ग्रीन सिटी हा खिताब जिंकला आहे. यासोबतच हैदराबाद शहराने लिव्हिंग ग्रीन फॉर इकनॉमिक रिकव्हरी अँड इन्क्लुसिव्ह ग्रोथ या श्रेणीतही एक पुरस्कार पटकावला आहे.

( हेही वाचा : “भाजपने निवडणूक लढवू नये; ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं”; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र)

हैदराबाद वर्ल्ड ग्रीन सिटी

एचआयपीएचतर्फे एकूण 6 श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले गेले. यात एकूण 18 शहरांशी स्पर्धा होती. अंतिम यादीतील देशांमध्ये कोलंबिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,तुर्की, मेक्सिको, ब्राझिल, नेदरलँड, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, इराण भारत या देशातील शहरांचा समावेश होता. या यशाबाबत बोलताना तेलंगणा राज्य सरकारने म्हटले की, हैदराबाद हे भारतातील एकमेव शहर आहे, ज्याची निवड या पुरस्कारासाठी झाली होती. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. यात हैदराबादमधील आऊटर रिंग रोड (ओआरआर) चा मोठा वाटा आहे. हा रिंग रोड तेलंगणासाठी ग्रीन नेकलेस आहे. येथील हिरवळ ही या पुरस्कारात महत्त्वाची ठरली आहे. सर्व शहरवासीयांना समाधान देणारे हे ठिकाण आहे. दरम्यान, राज्याचे नगर प्रशासन मंत्री के. टी. रामाराव यांनी या यशाबद्दल सर्व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात शहरात हिरवळीसाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकारच्या तेलंगणा कू हरिथा हरम या अभियानातून राज्यात हरित आवरण वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.