पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सुंदर अशा मूर्तीला पाहण्यासाठी हजारो लोकांनी उपस्थिती लावली. राम मंदिर बांधकामांत सहभागी असलेल्या मजुरांचा सन्मान केला. तर ज्यांनी ही मूर्ती बनवली ते मूर्तिकार योगीराज हे ही भावुक झाले होते. (Ayodhya Ram Mandir)
राम मंदिर बांधकामात सहभागी असलेल्या मजुरांवर नरेंद्र मोदी यांनी पुष्पवृष्टी केली. अरुण योगीराज यांनी ही अतिशय सुंदर मूर्ती तयार केली आहे. मूर्तिकार अरुण योगीराज यांनी स्वत:ला जगतील सर्वात भाग्यवान व्यक्ती असल्याचं सांगितलं आहे. मला वाटत की मी स्वप्नांच्या जगात आहे. माझे पूर्वज, कुटुंबातील सदस्य आणि प्रभू राम यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. अशीही प्रतिक्रिया योगीराज यांनी दिली आहे. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा : Mohan Bhagwat : आज भारताचा ‘स्व’ अयोध्येत रामलल्लासोबत परतला आहे – मोहन भागवत)
या भव्यदिव्य सोहळयाला हजारो जण उपस्थित होते. संत महंतांपासून अनेक दिग्गज सेलिब्रेटीनी हजेरी लावली. राम मंदिराच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्यांना संबोधित केल्यानंतर त्यांनी मजुरांचा सत्कार केला. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित पाहुण्यांची भेट घेतली. तर शतकानुशतकांच्या प्रतिक्षेनंतर आपले राम आले आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत असेही मोदी यांनी म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community