IAF Aircraft: जैसलमेरमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

212
IAF Aircraft: जैसलमेरमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

भारतीय हवाई दलाचे दूरस्थ उड्डाण करणारे विमान राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील पिथला गावात कोसळले, अशी माहिती भारतीय हवाई दलाने गुरुवारी (२५ एप्रिल) दिली आहे. विमान कोसळल्यामुळे कोणताही कर्मचारी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचेही हवाई दलाने सांगितले आहे. (IAF Aircraft)

भारतीय हवाई दलाच्या रिमोटली पायलटेड विमानाला गुरुवारी जैसलमेरजवळ नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अपघात झाला”, अशी माहिती आयएएफने त्यांच्या अधिकृत ‘X’हँडल पोस्ट करून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “कोणत्याही कर्मचाऱ्याचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आली आहे, असेही म्हटले आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार,
हे विमान (Indian Air Force) सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून होते, असं सांगितलं जात आहे. पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितलं की, ते हेरगिरी करणारं विमान असू शकते. विमान क्रॅश झाल्यानंतर त्यात मोठी आग लागली होती. त्यामुळे ते जळून राख झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. हवाई सेवेच्या या विमानात पायलट नसतात. ते रिमोट कंट्रोलने चालवले (Plane Crashed In Rajasthan) जाते. या विमानाचा वापर सीमा भागातील हेरगिरीच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. जैसलमेरच्या पिठाळा गावाजवळ (Pithala Area) हे विमान मोठा स्फोट होऊन खाली कोसळले. (IAF Aircraft)

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: अमेरिकेत विद्यार्थ्यांनी निदर्शनं केल्यामुळे बायडन सरकार चिंतेत, विद्यापीठांमध्ये सामूहिक अटक सत्र सुरू )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.