शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेतील एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुशील खोडवेकर यांना अटक केल्याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एस. हाके यांनी दिली आहे.
२००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी
पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर यांना शनिवारी, २९ जानेवारी, रोजी दुपारी ठाण्यातून अटक केली. ते २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून ते कार्यरत होते. तर शिक्षक भरती परीक्षेतील गैरव्यवहारात त्यांचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई केली गेली आहे. या प्रकरणातील आतापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जात आहे. तसेच आता खोडवेकर यांच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहेत, हे देखील उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेल्या आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर हे उपसचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत आहेत. पुणे सायबर पोलिसांनी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व प्रितीश देशमुख यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा सैन्याची परीक्षा लांबणीवरच, विद्यार्थ्यांमध्ये संताप! ट्विटरवर #JusticeForArmyStudents ट्रेंड होतोय)
Join Our WhatsApp Community