मुंबईत होणार 21वी वर्ल्ड काॅंग्रेस ऑफ अकाउंट्न्स, लोकसभा अध्यक्षांसह देश-विदेशातील मान्यवर राहणार उपस्थित

94

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्न्स ऑफ इंडियातर्फे मुंबईत ‘२१ वी वर्ल्ड काॅंग्रेस ऑफ काउंट्न्स २०२२‘चे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसांच्या कार्यक्रमाचा प्रारंभ १८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे.  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि देश-विदेशातील चार्टर्ड अकाउंटंट आणि अकाउंटंट आस्थापनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधानांनी १ जुलै २०१७ रोजी आपल्या भाषणात म्हटले होते की, चार्टर्ड अकाउंटन्ट हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे विश्वासू संदेशवाहक आहेत. त्यांनी चार्टर्ड अकाउंटन्टच्या स्वाक्षरीची पंतप्रधानांच्या स्वाक्षरीशी बरोबरी केली. त्यात देशातील चार्टर्ड अकाउंटन्टच्या उपयुक्ततेचा उल्लेख आहे. त्यावेळी देशात सुमारे साडेतीन लाख चार्टर्ड अकाउंटन्ट होते. भारतीय चार्टर्ड अकाउंट्न्स ही संस्था विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित पदावर काम करण्याची संधी देते. या संस्थेतर्फे १८ नोव्हेंबर २०२२ पासून २१व्या वर्ल्ड चार्टर्ड अकाउंटन्ट काँग्रेसचे आयोजन केले जात आहे. या चार दिवसीय काँग्रेसमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे. हा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ सेंटरमध्ये हायब्रीड पद्धतीने होणार आहे.

( हेही वाचा: तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले आहे का? जाडसरपणा कमी करायला शस्त्रक्रिया करण्यासाठी विमा कंपन्यांची टाळाटाळ )

कार्यक्रमाचे मुख्य विषय

  • रोल ऑफ अकाउंन्टिंग प्रोफेशन इन एनैब्लिंग सस्टेनबिलिटी
  • ग्लोबल कोलाबरेशन फॉर इन्क्लूसिव ग्रोथ
  • ग्रोविंग इम्पोर्टेन्स ऑफ डिजिटल टेक्नोलॉजीस
  • इन्टिग्रिटी, एथिकल लीडरशिप एंड ट्र्स्ट
  • ग्लोबल ट्रेन्ड्स इन अकाउंन्टिंग, ऑडिटिंग, कॉर्पोरेट गवर्नेंन्स एंड टैक्सेशन
  • नर्चरिंग इनोवेशन, फिनटेक एंड स्टार्ट अप्स
  • फ्यूचर रेडी प्रोफेशन

स्ट्रेंन्थनिंग पब्लिक फाइनान्शियल मॅनेजमेंन्ट्स कार्यक्रमात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, सेबीचे कार्यकारी संचालक, विविध सरकारी अधिकारी आणि अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) चे पदाधिकारी आणि संबंधित कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात पत्रकार परिषद घेत आयसीएआयचे अध्यक्ष सीए (डॉ.) देबाशीष मित्रा, उपाध्यक्ष सीए अनिकेत तलाटी यांनी माहिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.