कोचर दाम्पत्याला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

आयसीआयसीआय बॅंक व्हिडीओकाॅन लोन घोटाळा प्रकरणी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. कोचर दाम्पत्याला सीबीआयने केलेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका न्यायालयाने मंजूर केली आहे. कोचर दाम्पत्याला सीबीआयने केलेली अटक बेकायदेशीर असल्याच्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत जेलमधून तत्काळ सुटकेची मागणी कोचर यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती.

काय आहे प्रकरण?

ICICI बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन करुन व्हिडिओकाॅन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. व्हिडिओकाॅन समूहाला ICICI बॅंकेकडून कर्ज मिळाल्यानंतर धूत यांनी 2012 मध्ये NuPower Renewables Pvt.ltd मध्ये करोडो रुपायांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. ICICI कडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दोन नातेवाईकांसह धूत यांनी ही फर्म सुरु केली. अज्ञाताने दिलेल्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. जानेवारी 2019 मध्ये्, केंद्रीय CBI ने वेणुगोपाल धूत, चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्यावर गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित कलमांसाठी गुन्हा दाखल केला. फेब्रुवारी 2019 मध्ये, ईडीने मनी लाॅन्ड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता.              

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here