ICICI बॅंक व्हिडिओकाॅन लोन घोटाळा प्रकरणी कोचर दांपत्य आणि वेणूगोपाल धूत यांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. कोचर दाम्पत्यासह, वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कोठडी संपत असल्याने, बुधवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयने या तिनही आरोपींची कोठडी वाढवून मागितली. परंतु, कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांकडून सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला.
( हेही वाचा: विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन )
तिनही आरोपींच्या कोठडीत वाढ
कोचर दाम्पत्याला सीबीआयने दिल्लीत अटक केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळीच मुंबई सत्र न्यायालयात त्यांना रिमांडसाठी हजर करण्यात आले असता, त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. या कोठडीत सोमवारी आणखीन तीन दिवसांची वाढ करत ही कोठडी 28 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. या रिमांडला कोचर दाम्पत्याने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटक आणि कोठडीला आव्हान दिले होते. सुट्टीकालीन खंडपीठासमोर कोचर यांचे वकील कुशल मोर यांनी ही याचिका सादर करत त्यावर तातडीच्या सुनावणीची विनंती केली. परंतु न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे कोठडी संपल्यानंतर तिनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. बुधवारी तिघांनाही दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community