तुम्हाला कोरोना झालाय? उपचारात ‘या’ औषधाचा चुकूनही करू नका समावेश

101

गेल्या दीड-दोन वर्षभरापासून कोरोनाने सर्वांनाच हैराण केले आहे. अशातच कोरोनावर उपचार म्हणून अनेक औषधांची शिफारस केली गेली. तर दोन कोरोनाविरोधी लस घेतल्या कोरोनाचा धोका कमी असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र तुम्हाला कोरोना झाला असेल आणि तुम्ही कोरोनाचे उपचार घेत असाल तर कोरोनाच्या उपचारात ‘मोलनुपिरावीर’ या औषधाचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना उपचारात ‘मोलनुपिरावीर’ जास्त फायदेशीर नसल्याचं ICMR ने म्हटले आहे. ICMR च्या तज्ज्ञांनी सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत मोलनुपिरावीर जास्त फायदेशीर नसल्याचे सांगितले आहे.

(हेही वाचा – मुंबईला आणखी टेन्शन! ‘या’ दोन आजारांनी काढलं डोकं वर)

ICMR ने केला असा दावा

कोरोनावर उपचार करण्यासाठी मोलनुपिरावीर या औषधाला मान्यता मिळाली आहे. परंतु हे औषध होणाऱ्या संततीसाठी धोकादायक असल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे. ICMR च्या तज्ज्ञांनी सुरक्षेच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच यामुळे औषधांच्या यादीतून वगळण्यात येत आहे. हे औषध फायद्याचे असले तरी ते महिलांना देण्यात येऊ नये असा सल्ला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) टास्क फोर्सने दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोलनुपिरावीर औषध सर्दी खोकल्यावर उपचार करण्यासाठी बनवले होते. हे औषध १८ वर्षांवरील नागरिकांना देण्याची परवानगी आहे. तसेच महिलांवर उपचार करण्यासाठी हे औषध फायदेशीर नसल्याचे आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या औषधामुळे संततीवर परिणाम

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधितांना उपचारादरम्यान मोलनुपिरावीर देत असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या औषधामुळे आयसीयूमध्ये रुग्ण भरती करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु या औषधामुळे संततीवर परिणाम होत आहे. अनुवंशिक भिन्नता संबंधित समस्या उद्भवू शकतात असे मत आयसीएमआर प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे. आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी असे सांगितले की, या औषधासंदर्भात मुख्य सुरक्षा समस्या आहेत. यामुळे गर्भाची विकृती होऊ शकते तर स्नायूंनाही नुकसान पोहोचू शकते. त्याशिवाय औषध घेतल्यानंतर तीन महिने स्त्री आणि पुरुष दोघांनीही गर्भनिरोधक उपायांचा अवलंब करावा, असा सल्ला ही त्यांनी दिला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.