कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचे संमिश्र डोस अधिक प्रभावशाली! आयसीएमआरची मोठी माहिती

कोरोनावर मात करण्यासाठी जगासह भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू आहे. त्याचबरोबर अनेक प्रयोग केले जात आहेत. तसाच एक नवा प्रयोग भारतात करण्यात आला आहे. कोरोनाविरुद्ध उपलब्ध असलेल्या कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचे संमिश्र डोस दिल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. अशी माहिती इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे. या दोन्ही लसींचा संमिश्र डोस घेणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढत असून, कोरोना लसीकरणाला वेग येईल, अशी माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः भारताला आणखी एका लसीची साथ! कोरोनावर ‘सिंगल’ डोसने होणार मात!)

संशोधनात माहिती समोर

याआधी कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचे वेगवेगळे डोस घेतल्याने त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण आता या दोन्ही लसींचे संमिश्र डोस घेणे सुरक्षित असल्याचे नव्या अभ्यासात समोर आले आहे. वेल्लोरमधील ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजला कोविड-१९ च्या मिश्र चाचणीची परवानगी मिळाली होती. केंद्रीय औषध नियमक मंडळाच्या एका समितीने ही शिफारस केली होती. त्याला मंजुरी दिल्यानंतर चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

भारतात आणखी एका लसीला मान्यता 

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. देशात विविध राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लसीकरणावर भर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

पहिलीच सिंगल डोस लस

भारतात परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन ही पहिलीच सिंगल डोस लस असून दोनच दिवसांपूर्वी कंपनीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या लसीचा एक डोस प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. कोरोनावर जॉन्सन अँड जॉन्सनची लस ८५ टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच साऊथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

(हेही वाचाः नको असेल तिसरी लाट, तर लाऊ नका नियमांची वाट)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here