ओमिक्रॉन विरूद्ध लढा देण्यास ‘ही’ लस प्रभावी?, ICMR नं दिलं उत्तर

144

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जगभरात एकच खळबळ माजली आहे. या व्हेरियंटमुळे जगभरातील लोकांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता या नव्या व्हेरियंटच्या शिरकाव्याने पुन्हा भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. परंतु कोरोनाविरोधी लढा देणारी लस ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक ठरणार का? यावरही संभ्रम आहे. दरम्यान, भारत बायोटेकची कोविड लस कोव्हॅक्सिन ओमिक्रॉन व्हेरिएंटविरुद्ध अधिक प्रभावी ठरू शकते, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अधिकाऱ्याने सांगितले आहे.

नव्या व्हेरिएंटविरूद्ध लस प्रभावी

यासह असेही सांगितले जात आहे की, इतर उपलब्ध असलेल्या कोरोना लसींच्या तुलनेत ओमिक्रॉन विरूद्ध कोव्हॅक्सिन अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिन लस संपूर्ण व्हायरस कव्हर करते तसेच, या उत्परिवर्तित नव्या व्हेरिएंटविरूद्ध कार्य करू शकते. इतकेच नाही तर कोव्हॅक्सिन लस ही अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा सारख्या इतर प्रकारांविरूद्ध देखील प्रभावी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लस ही नव्या व्हेरिएंटविरूद्ध देखील प्रभावी ठरेल, अशी ICMR ला आशा आहे.

(हेही वाचा – प्रदूषणाला अटकाव! आता दिल्लीत धावणार ग्रीन हायड्रोजनवरील वाहनं)

नव्या व्हेरियंटबद्दल अधिक चिंता 

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला B.1.1.529 असे नाव दिले होते, मात्र त्यानंतर WHO ने Omicron म्हणून हा व्हेरियंट ओळखला जाईल, असे म्हटले आहे. ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ या श्रेणीत ओमिक्रॉन असल्याने अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच WHO ने एका निवेदनात म्हटले की, ही चिंतेची बाब असून कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमध्येही वेगाने उत्परिवर्तन होत आहे.

कोवॅक्सिनसह 7 लस अधिक प्रभावी

गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, कोविशिल्ड, फायझर, नोवावॅक्स, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, वलनेवा आणि क्योरवैक लसीचे बूस्टर डोस अधिक प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.