AIIMS नंतर ICMR च्या वेबसाईट हॅकर्सचा डोळा; 24 तासांत 6000 वेळा सायबर हल्ला

127

दिल्लीतील एम्स हॉस्पिटलच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMR या भारत सरकारच्या आरोग्य संशोधन वेबसाईटला हॅकर्सने लक्ष केल्याचे समोर आले आहे. हॅकर्सचा आयसीएमआरच्या वेबसाईटवर डोळा असून त्यावर सातत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. हॅकर्स सतत आयसीएमआरच्या वेबसाईटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असून आयसीएमआरच्या टीमने त्यांना वेळीच रोखले.

(हेही वाचा – New labour Code : कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवीन श्रम कायदा! सामाजिक सुरक्षेवर भर, मिळणार असंख्य फायदे…)

दरम्यान, राष्ट्रीय विज्ञान केंद्र (NIC) ने दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर रोजी २४ तासात आयसीएमआरच्या वेबसाईटवर ६००० हून अधिक वेळा सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होतो, पण हॅकर्सचा हल्ला अयशस्वी ठरला. एका अधिकाऱ्याने माहिती देताना असे सांगितले की, आयसीएमआरच्या वेबसाईटवर उपलब्ध डेटा सुरक्षित आहे. वेबसाईटची सुरक्षा ही राष्ट्रीय विज्ञान केंद्र (NIC) डेटा सेंटरची जबाबदारी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉंगकॉंग स्थित आयपी अॅड्रेसवरून हॅकर्सनी ३० नोव्हेंबर रोजी २४ तासात सुमारे ६००० वेळा आयसीएमआरची वेबसाईट हॅक करत त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता आयसीएमआरला लक्ष्य करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.