मुलांना मॉलमध्ये घेऊन जाताय? तर ‘हे’ सोबत बाळगा

राज्यातील शॉपिंग मॉल, रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर, आता ठाकरे सरकारने शॉपिंग मॉलमधील प्रवेशाबाबत नवीन सुधारित आदेश दिले आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील मुला-मुलींना शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा दाखवणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे मुलांना मॉलमध्ये घेऊन जाताना पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

हा पुरावा द्यावा लागणार

जर तुम्ही 18 वर्षांखालील आहात, तर तुम्हाला वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा पुरावा असलेल्या शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र मॉलमध्ये प्रवेश करताना, प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक राहणार असल्याचे सरकारच्या आदेशात म्हटले आहे.

(हेही वाचाः कोरोनाच्या दोन लसी घेतल्या असतील तर काढा लोकलचा ई-पास…कसा ते वाचा…)

आणखी काय आहेत सुधारित आदेश?

राज्य सरकारकडून आलेल्या सुधारित आदेशामध्ये राज्यातील सर्व शॉपिंग मॉलला दररोज रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचे दोन डोस झालेले असावेत. तसेच दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे. तसेच लसीकरण प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दाखवणे बंधनकारक राहणार आहे.

(हेही वाचाः पगाराविना एसटी कर्मचा-यांची ‘घर’गाडी रखडली)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here