कर्नाटक सध्या या ना त्या कारणाने सतत वादात सापडत आहे. हिजाबचा मुद्दा असो अथवा वीर सावरकर यांची प्रतिमा लावण्याचा मुद्दा असो कर्नाटकात कायम हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाद होत आहे. हि वादाची मलिक गणेशोत्सवातही निर्माण होणार होती, पण खुद्द कर्नाटक उच्च न्यायालयानेच हा वाद मिटवला आहे.
रानी चेन्नम्मा मैदान नगर निगम का है, इसलिए हमने समिति महामंडल की ओर से अनुरोध किया था कि यहां इस गणपति उत्सव मनाने की अनुमति दी जाए। हम आधे घंटे में गणपति की मूर्ति स्थापित करेंगे: के गोवर्धन राव, संयोजक, रानी चेन्नम्मा मैदान गजानन उत्सव महामंडल pic.twitter.com/J6ZPiiKxZb
— ANI_HindiNews (@AHindinews) August 31, 2022
न्यायालयाने याचिका फेटाळून लावली
कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या ईदगाह मैदानावर कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होऊ नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळे या मैदानात यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. मात्र आता न्यायालयाने यातून तोडगा काढला आहे. त्यामुळे या मैदानात गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. इथे विधिवत गणपतीची पूजा करण्यात येत आहे. गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी ईदगाह मैदानात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. याबद्दल राणी चेन्नम्मा मैदान गजानन उत्सव महामंडळाचे संयोजक के गोवर्धन राव यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, राणी चेन्नम्मा मैदान हे महापालिकेचे आहे, त्यामुळे येथे हा गणपती उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही समिती महामंडळाच्या वतीने केली होती. दुसरीकडे, रात्री उशिरा कर्नाटक उच्च न्यायालयाने हुबळी-धारवाड येथील ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्यास परवानगी देण्याचा निर्णय कायम ठेवला. धार्मिक विधी करण्यास परवानगी न देणाऱ्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
Join Our WhatsApp Community