मणकर्णिका कुंडात सापडल्या मूर्ती, नाणी, भांडी आणि बंदूक! 

कोल्हापूरातील सुप्रसिद्ध श्री अंबामाता मंदिर परिसरातील ऐतिहासिक मणकर्णिका कुंडाचे उत्खनन सुरु आहे. 

कोल्हापुरातील करवीर निवासीनी श्री अंबामातेच्या पुरातत्व मंदिर आवारात मणकर्णिका कुंड आहे, जे ६५ वर्षांपूर्वी बुजवण्यात आले होते. हे कुंड पुनर्जीवित करण्यात यावे, अशी मागणी अनेक दशके होत होती. अखेर याला मान्यता मिळाली आणि कुंडाच्या उत्खननाचे काम सुरु झाले आहे. त्यातून हिंदू आणि बौद्ध धर्मातील प्राचीन मूर्ती, नाणी, भांडी यांच्यासह बंदूकही सापडली.

काय आहे मणकर्णिका कुंड?  

 • श्री अंबामाता मंदिराची उभारणी करतानाच या ठिकाणी मनकर्णिका कुंड उभारण्यात आले होते.
 • ६० बाय ६० फुटाचे हे कुंड आहे. कुंडात उतरण्यासाठी दक्षिण आणि उत्तर बाजूने पायऱ्यांच्या दोन वाटा आहेत.
 • या कुंडात ५० विरगळ आहेत, तर पाच ओवऱ्या असल्याचे आतापर्यंतच्या उत्खननात आढळून आले आहे.
 • कुंडाच्या चारही बाजुला शिवलिंग आहे. सुमारे १६ पाण्याचे झरे आहेत.

(हेही वाचा : आनंदवन कंटेनमेंट झोन! २४८ जण कोरोनाबाधित! )

उत्खनन कसे सुरु आहे? 

 • २०१३ मध्ये पुरातत्व विभागाने कुंड पुनर्जीवित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
 • सुमारे ६५ वर्षांपूर्वी हे कुंड बुजविण्यात आलेला मणकर्णिका कुंड खुला करण्याचा निर्णय घेतला.
 • जानेवारी २०२० मध्ये महापालिकेने हे कुंड देवस्थानला हस्तांतरीत केले. त्यानंतर जून २०२० पासून या कुडांचे उत्खनन करण्याचे काम सुरू झाले.
 • पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार पारंपरिक पद्धतीने उत्खनन सुरु आहे. आतापर्यंत साडे दहा मीटर पर्यंतचा गाळ काढलेला आहे.

 

उत्खननातून काय मिळाले? 

 • उत्खननात आतापर्यंत ४५७ वस्तू सापडल्या.
 • ‘मेड इन जर्मनी’ सहा ते सात इंच लांबीची बंदूक.
 • एक जिवंत काडतूस, आठ काडतुसांचा संच.
 • १३५ दुर्मीळ नाणी, प्राचिन मूर्ती, काचेच्या वस्तू, पितळेची टॉर्च, डबे, पेले.
 • अंगावर पाच ठिकाणी शिवलिंग असलेली आणि घोड्यावर बसलेली पार्वतीची दुर्मीळ मूर्ती.
 • मातीच्या सुमारे २५ विविध मूर्ती, बौध्द किंवा जैन धर्माशी प्रथमदर्शनी साधर्म्य असलेली दगडी मूर्ती.
 • संपूर्ण सुरक्षित स्थितीत एक काचेचा कंदिल, गणपतीची मूर्ती, टाक, १३५ तांब्यांची नाणी.
 • उत्खननादरम्यान काढण्यात येणाऱ्या मातीचेही होणार जतन, वाळवून, चाळून ठेवली जाणार.
 • उत्खननात सापडलेल्या वस्तू भाविकांसाठी संग्रहालय करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here