…तर महाराष्ट्रात होणार पुन्हा शाळा बंद; शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

105

देशभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या घटनांमुळे शाळा पुन्हा संकटात सापडल्या आहेत. या वर्षी मार्चमध्ये साथीच्या कोरोना-19 संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतरच टप्प्याटप्प्याने शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या होत्या. पण आता कोविडच्या नव्या व्हेरियंट ‘ओमायक्रॉन’ने देशभरात थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शाळा बंद करण्याची घोषणा केली जाऊ शकते. असे संकेत नुकतेच महाराष्ट्रातील राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्यात ओमायक्रॉनच्या वाढत्या रूग्ण संख्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत राहिल्यास राज्य सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.

(हेही वाचा – ओमायक्रॉनची धास्ती! केंद्राकडून महाराष्ट्राला ‘या’ महत्वाच्या सूचना!)

ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा पुन्हा बंद?

राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. अनेक वर्षांपासून शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांध्येही आनंदाचे वातावरण होते. मात्र ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा पुन्हा बंद करु असे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. देशभरात सध्या ओमायक्रॉनचे दोनशेहून अधिक रूग्ण झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात एकूण 54 रुग्ण आहेत. तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 57 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. दुसरीकडे, रुग्ण असेच वाढत राहिल्यास आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

रुग्ण वाढल्यास पुन्हा परीक्षा घेणे कठीण

नुकतेच 16 डिसेंबरपासून मुंबईतील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांची  शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, महाराष्ट्र एसएससी, एचएससी बोर्ड परीक्षा 2022 ची तारीख पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार 10वी आणि 12वीच्या परीक्षा मार्च आणि एप्रिलमध्ये होणार आहे, आता अशा परिस्थितीत रुग्ण वाढल्यास पुन्हा परीक्षा घेणे कठीण होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.