Indian Railway: रेल्वेचे आरक्षण करताय, तर आता ‘या’ प्रवाशांना मिळणार विंडो सीट, काय आहे रेल्वेचा नियम?

तुम्ही ट्रेनने प्रवास करताय तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जर तुम्ही ट्रेनमध्ये विंडो सीट बुक केली असेल तर त्यापूर्वी तुम्हाला ही गोष्ट नक्की माहिती असायला हवी. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रत्येकाला विंडो सीटवर बसून प्रवासाचा आनंद घ्यायचा असतो. पण ही विंडो सीट नेमकी कोणाला मिळते याबाबत रेल्वेने नवा नियम जारी केला आहे.

जाणून घ्या काय आहे रेल्वेचे नियम?

स्लीपर आणि एसी कोचच्या विंडो सीटची माहिती तिकिटावर दिलेली नसते. जिथे विंडो सीट असेल ती लोअर सीट मानली जाते. अशा परिस्थितीत विंडो सीटवर कोण बसणार हे कसे ठरवले जाते? तर विंडो सीटवर कोण बसणार हा प्रश्न केवळ चेअर कारमध्ये असतो. जो स्लीपर किंवा एसी कोचमध्ये नसतो.

या प्रवाशांनाच मिळते प्राधान्य

रेल्वेच्या नियमानुसार, ट्रेनमध्ये लोअर सीटवर ज्येष्ठांना प्रथम प्राधान्य दिले जाते. याशिवाय दिव्यांगांसाठी लोअर सीट सहज उपलब्ध असते. तसेच विंडो सीटवर फक्त लोअर बर्थवर असलेल्या व्यक्तीलाच बसण्याचा अधिकार असतो. अशा परिस्थितीत विंडो सीटवर कोण बसणार आणि कोण नाही हे प्रवासी स्वतः आपापसात ठरवू शकतात. मात्र स्लीपर किंवा एसीमध्ये विंडो सीटवर बसण्यासाठी रेल्वेचे कोणतेही विशिष्ट नियम नाहीत.

(हेही वाचा – Indian Railway: ट्रेनच्या बोगीवर असलेल्या या; पिवळ्या रेषांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?)

तेसच लोअर सीटवर बसण्याचा अधिकार फक्त दिवसा देण्यात आला आहे. यासह रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत प्रवाशाला त्याच्या सीटवर झोपण्याचा अधिकार आहे. यादरम्यान, टीटीईही प्रवाशांना कोणताही त्रास देऊ शकत नाही. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोअर बर्थचा कोटा फक्त 60 वर्षे आणि त्यावरील पुरुषांसाठी आहे. 45 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांसाठीही लोअर बर्थ ठरवलेले असते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here