म्हाडाचे घर घेताय? राज्य सरकारने उत्पन्न मर्यादेत केला मोठा बदल

93

मुंबईत स्वस्तात घरे उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाने उच्च उत्पन्न गटाच्या मोठा बदल केला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १८ लाखांहून अधिक आहे ते मुंबई, ठाणे, पुणे या महानगरातील घरांसाठी अर्ज करू शकणार नाही. राज्य सरकारने दिलेल्या २५ मे रोजीच्या आदेशानुसार म्हाडाने सोडतीच्या उत्पन्नाच्या मर्यादेत बदल केला आहे. यानुसार मुंबई, ठाणे, पुण्यासह मोठ्या महानगरातील १८ लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांना म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार नाही. उच्च उत्पन्न गटासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १२ लाख ते १८ लाख निश्चित केली आहे.

( हेही वाचा : AAI Recruitment 2022 भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी!)

राज्य सरकारने नियमात केला बदल

यासंदर्भात राज्य सरकारने २५ मे रोजी अध्यादेश जारी केला आहे. यानुसार उच्च उत्पन्न गटासाठी वार्षिक मर्यादा ९ लाखावरून आता १२ ते १८ लाख अशी केली आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न दीड लाखांपर्यंत असेल तेच मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर मोठ्या शहरातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करू शकतील. सरकारच्या या निर्णयामुळे उच्च उत्पन्न गटात येणारे प्रशासकीय अधिकारी, छोटे-मोठे व्यापारी, खासगी क्षेत्रातील नोकरदार, कलाकार यांना मुंबई, ठाण्यात म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार नाही. मुंबई, पुणे, ठाणे ही मोठी शहरे वगळून उर्वरित महाराष्ट्रासाठी १८ लाखांच्यापुढे उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश उच्च उत्पन्न गटात करण्यात आला आहे.

नवीन बदलानुसार प्रत्येक गटासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा अशी असेल

  • अत्यल्प गट – ६ लाख रुपये वार्षिक
  • अल्प गट – ६ लाख ते ९ लाख रुपये वार्षिक
  • मध्यम गट – ९ लाख ते १२ लाख रुपये
  • उच्च गट – १२ लाख ते १८ लाख रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.