आता गंगा, गोदावरी नदीमधील विषारी धातूंचे परीक्षण होणार

धातू चाचणीसाठी गंगा नदीतून सुमारे शंभर नमुने यापूर्वीच विविध विभागातून संकलित केले गेले आहेत.

भारतातली नदी प्रणाली ही खूप मोठी आहे. उत्तर भारतात गंगा आणि दक्षिण भारतातील गोदावरी या भारतातील लांब आणि पवित्र नद्या मानल्या जातात. पण अनेक कारणांमुळे नद्यांमधील प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या प्रदूषणाची अचूक माहिती मिळवण्यासाठी, बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेकडून लवकरच एक यंत्रणा काम करणार आहे. याद्वारे गंगा, कावेरी आणि गोदावरी नदीतील विषारी धातू प्रदूषणाचे प्रमाण नमुन्यांच्या आधारे अधिक अचूकतेने ओळखता येणार आहे.

पाण्याची गुणवत्ता तपासणार

ट्रिपल क्वाड्रूपोल मास स्पेक्ट्रोमीटर मॉडेलसह सुसज्ज ही यंत्रणा, अत्यंत कमी काळात नद्यांमधील अतिशय अवघड धातू जे विषारी देखील असू शकतात, त्यांची माहिती घेऊ शकणार आहे. त्यासाठी गंगा नदीमधून नमुने गोळा करण्यात आले असून, लवकरच त्याचे परीक्षण केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे तयार करण्यात आलेल्या 17 शाश्वत विकास लक्ष्यांपैकी, स्वच्छ व परवडणारे पाणी हे लक्ष्य साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नद्यांमधील विषारी धातूंचे परीक्षण केले जाणार आहे.

गंगेतील 100 नमुन्यांचे होणार परीक्षण

या प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक आणि भारतीय प्राध्यापक(आयआयएससी)चे सहाय्यक प्राध्यापक संबुद्ध मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, धातू चाचणीसाठी गंगा नदीतून सुमारे शंभर नमुने यापूर्वीच विविध विभागातून संकलित केले गेले आहेत. तसेच या परीक्षणाचा भाग म्हणून, कावेरी नदीतील पाण्याचे नमुने गोळा करण्यासाठी, तामिळनाडूच्या पिचावरम येथून नमुने गोळा करण्यात येणार आहेत. येत्या हिवाळ्यात हे नमुने गोळा केले जाणार आहेत.

असे होणार परीक्षण

या नमुन्यांचे परीक्षण करण्यासाठीची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. सर्वप्रथम समुद्राचे पाणी शिरल्यामुळे पाण्यातील सोडिअमचे प्रमाण मोजले जाणार आहे. याबाबतचे परीक्षण करणे अवघड असते. समुद्रातील पाण्यामुळे होणारा परिणाम शून्यावर आणण्यासाठी संशोधक मॅट्रिक्स जुळणीचा वापर करतात. नमुने गोळा केल्यानंतर प्रयोगशाळेत पाण्याच्या गाळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते. यासाठी एक दिवसाचा कालावधी लागतो, असे मिश्रा यांनी सांगितले.
पाण्याचे परीक्षण झाल्यानंतर साधनांच्या आधारे पाण्यातील विषारी धातूंचे प्रमाण प्रति ट्रिलियन दहा भागांपर्यंत खाली आणता येऊ शकते, असेही त्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here