IIT मुंबई सर्वोत्तम संस्थांमध्ये देशात दुसरे!

इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स देशात प्रथम

84

दरवर्षी ब्रिटिश कंपनी क्यूएस रँकिंगकडून क्रमवारी जाहीर केली जाते. ही रँकिंग जगातील विद्यापीठ आणि संस्थांची गुणवत्ता आणि त्यांच्या दर्जाबाबत क्रमवारी जाहीर करत असते. या क्रमवारीमध्ये देशातील महत्त्वाची संस्था असलेल्या आयआयटी, मुंबईने जागतिक क्रमवारीत १७२ वे स्थान मिळविले आहे.

आयआयटी मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर

आयआयटीच्या मानांकनात गेल्यावर्षीपेक्षा ५ स्थानांची सुधारणा झाली आहे. क्यूएस रँकिंगने बुधवारी २०२२ या वर्षातील विद्यापीठ व संस्थांची क्रमवारी जाहीर केली. मिळालेल्या माहितीनुसार, क्यूएस रँकिंगने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीमध्ये आयआयटी मुंबईने देशात अव्वल स्थान मिळवले होते, मात्र या वर्षी इंडियन इन्स्टिट्यूट सायन्सच्या क्रमवारीत त्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला असून, आयआयटी मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – राऊतांचा भाजपला पुन्हा चिमटा; म्हणाले, “झुठी शान के परिंदे ही ज्यादा…” )

बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स मागीलवर्षी जगातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये १५५ व्या क्रमांकावर आहे. २०२२ मध्ये ही संस्था १८६ व्या क्रमांकावर होती. संस्थेने क्रमवारीत वर्षभरात ३१ स्थानांनी झेप घेतली आहे. आयआयटी मुंबईने १०० पैकी ४६.७ गुण मिळवत देशात दुसरे स्थान मिळवले आहे. आयआयटी मुंबईने १०० पैकी ४६.७ गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे. तर आयआयटी मुंबईला शैक्षणिक प्रतिष्ठेसाठीचे ८६.५ गुण मिळाले असून, मागील वर्षीपेक्षा त्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या मानांकनात घसरण

क्यूएस आशियातील विद्यापीठांच्या क्रमवारीनुसार मुंबई विद्यापीठाच्या क्रमवारीत सातत्याने घसरण होत आहे. मागीलवर्षी २७१ ते २८० मध्ये स्थान मिळाले होते, मात्र यंदा ते स्थान २००१-१२०० च्या टप्प्यात घसरले असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.