भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एका आयआयटीच्या मुलाने व्हाॅट्सअॅप स्टेटस ठेवत आत्महत्या केली आहे. अनुराग विजय गायधने वय 21 असे आत्महत्या करणा-या मुलाचे नाव असून, त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
‘असं’ होतं स्टेटस
अनुराग हा भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील एका आयटीआय प्रशिक्षण शिक्षण संस्थेत शिकत होता. परंतु, परीक्षेत नापास झाल्यामुळे तो नैराश्यात होता. या नैराश्यातूनच त्याने माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज असा स्टेटस ठेवले होते. स्टेटस वरूनच अनुराग याने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.
( हेही वाचा: मालकांनो! … तर अपघाताची जबाबदारी तुमचीच )
अद्याप मृतदेह बेपत्ता
अनुराग याच्या व्हाट्अॅपवरील स्टेटसवरुन त्याचा मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. परंतु, अद्याप त्याचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे आज पुन्हा पोलिसांचे शोधकार्य सुरु असून, या घटनेचा पुढील तपास देव्हाडी पोलीस करत आहेत. अनुराग याच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर, त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीयांनी वैनगंगा नदीवरील माडगी पुलावर गर्दी केली होती. त्याने उचललेल्या या धक्कादायक पावलामुळे तुमसरसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.