‘प्रतापगड’नंतर पुण्यातील चाकणच्या ‘संग्रामदुर्ग’च्या अतिक्रमणावर हातोडा!

पुण्यातील चाकण जवळील संग्रामदुर्ग किल्ल्यावरील बेकायदा असलेले बांधकाम हटवण्यात आले आहे. प्रतापगड पाठोपाठ या किल्ल्यावर देखील ही कार्यवाही करण्यात आली आहे. पुण्यात अतिक्रमण हटवण्याचा धडाका सुरू आहे. दरम्यान, ऐतिहासिक किल्ल्यावर केलेल्या अनधिकृत बांधकाम बाधा ठरत होते. त्यामुळे पुरातत्व विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा – T20 World Cup 2022: दारुण पराभवानंतर वर्षभरात होणार टीम इंडियामध्ये ‘हे’ मोठे बदल)

पुण्यातील चाकणजवळ हा संग्रामदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यावरचं बांधकाम हटवण्यासाठी पुरातत्व विभागाकडून चार वेळा नोटीस देण्यात आली होती. मात्र या नोटीसनंतरही हे बांधकाम हटवलं जात नव्हत अखेर बुधवारी पोलिसांच्या मदतीने पुरातत्व विभागाने या बेकायदेशीर अतिक्रमणावर हातोडा मारला आहे.

या किल्ल्यावर पत्राशेड टाकण्यात आले होते. हे किल्ल्याच्या वास्तूला बाधा पोहोचवली जात होती. हे पत्राशेड आणि या परिसरात असलेले अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे, अशी मागणी या किल्ल्याची किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने पुरातत्व विभागाकडे करण्यात आली होती. किल्ले संरक्षणासाठी काम करणाऱ्या काही संघटनांनी या विषयी तक्रार दिली होती. त्यानंतर पुरातत्व विभागाने ही कारवाई नगर परिषद आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यांच्या पाठिंब्याने हे अतिक्रमण बुधवारी हटवण्यात आले आहे. तर गुरूवारीच प्रतापगडवरच्या अफजल खानच्या कबरीजवळचं अतिक्रमणही हटवण्यात आले आहे.

.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here