यावर्षी 21 मे रोजी होणाऱ्या NEET PG परीक्षेच्या 2022 च्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे आता इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून NEET PG च्या परीक्षेची तारीख पुन्हा शेड्युल करण्याची विनंती केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना लिहिलेल्या पत्रात 21 मे 2022 रोजी होणारी NEET परीक्षा पुन्हा शेड्यूल करण्यात यावी, असे म्हटले आहे. त्यानंतर अशी शक्यता वर्तविली जात आहे की, NEET PG च्या परीक्षेची तारीख लवकरच बदलू शकते.
15 जानेवारीपासून सुरू झाली नोंदणी
NEET परीक्षा म्हणजे राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा. यंदाची नोंदणी प्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरू झाली होती. ज्या उमेदवारांना पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करायची आहे, त्यांना अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर अर्ज करावा लागणार आहे. त्याच वेळी, अशी परीक्षा राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) द्वारे आयोजित केली जाते. विरोध आणि इतर कारणांमुळे या परिक्षांच्या तारखा बदलत आहेत. आता फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) ने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून समुपदेशन प्रक्रियेतील विलंबामुळे 21 मे रोजी होणारी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
Indian Medical Association (IMA) wrote a letter to Union Health Minister Mansukh Mandaviya to "reschedule the NEET PG exam scheduled for 21st May 2022" pic.twitter.com/Y9gFUImrgM
— ANI (@ANI) May 12, 2022
(हेही वाचा – पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश,रुबी हॉल क्लिनिकच्या १५ जणांवर गुन्हा)
या पत्रात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने नमूद केले आहे की वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) 30 एप्रिल रोजी तात्पुरती स्ट्रे व्हॅकन्सी ‘नल अँड व्हॉईड’ म्हणून घोषित केली होती आणि त्याचे निकाल 2 मे 2022 रोजी प्रसिद्ध झाले होते. शेवटी परीक्षेची तारीख वाढवावी. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरही अनेक विद्यार्थी अशा मागण्या करत होते.
Join Our WhatsApp Community