दक्षिण कोकणासह कोल्हापूर, साताऱ्याला Red Alert; उत्तर कोकणातही पावसाचा जोर कायम

107

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंगळवारी दुपारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला. कोल्हापूर आणि साताऱ्यालाही मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल. उत्तर कोकणातही पावसाच्या सरींचा वेग आता वाढला असल्याने उत्तर कोकणात आता येलो अलर्ट ऐवजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मंगळवारी दुपारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट दिला जातो तेव्हा अतिवृष्टीची दाट शक्यता असते. ऑरेंज अलर्टसह अतिवृष्टीचा इशारा दिल्यास संबंधित ठिकाणी रेड अलर्टच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहते. उत्तर कोकणातील पालघर येथे शुक्रवारी अतिवृष्टीसाठी केवळ रेड अलर्ट देण्यात आला आहे.

12 3

राज्यातील किनारपट्टी भागात पश्चिम दिशेकडून वारे वाहत आहेत. यासह मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाले आहे. गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती (कमी दाबाचे क्षेत्र) तयार झाले आहे. त्यामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. – जयंता सरकार, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते

कोकणासह नाशिक आणि पुण्यातही जोरदार पाऊस सक्रीय झाला आहे. पुण्यात मंगळवारपासून शनिवारपर्यंत अतिवृष्टीसह ऑरेंज अलर्ट आहे तर नाशिकमध्ये बुधवारपासून पावसाचा जोर वाढलेला दिसेल. यासह कोल्हापूर आणि साताऱ्यात शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारी दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी मुंबईसह पालघर, ठाण्यात जोरदार सरीसह ऑरेंज अलर्ट असेल तर बुधवारपासून तिन्ही जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्यासह ऑरेंज अलर्ट तर शुक्रवारी पालघरमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.