जानेवारी अलर्ट! मुंबईत पाऊस तर, विदर्भात गारा पडण्याची शक्यता

146

शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई शहराचे तापमान गेल्या २४ तासांत ३ अंश सेल्सिअसने घसरले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रूझ वेधशाळेने शनिवारी, २७.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले आहे. तर शुक्रवार, ७ जानेवारीला वेधशाळेने मुंबईत ३०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले होते. तर, हवामान विभागाकडून विदर्भात अलर्ट जारी करण्यात आला असून गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सर्वाधिक पाऊस

शनिवारी संपूर्ण मुंबई शहरात सुमारे ४ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या दहा वर्षातील जानेवारीतील हा सर्वाधिक पाऊस होता. याआधी मुंबईत, १९९४ मध्ये जानेवारीत सर्वाधिक १७.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, २०२१ मध्ये ०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वातावरणातील बदल तसेच वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रवाहांमुळे पुढील दोन दिवसांपर्यंत हवामानात उच्च आर्द्रता कायम राहण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : अखेर निर्बंध लागलेच! रात्री संचारबंदी! दिवसा काय असणार बंद? जाणून घ्या… )

विदर्भात अलर्ट

हवामान विभागाकडून ९ ते १३ जानेवारी दरम्यान विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, काही भागात गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.