Unseasonal Rain : मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचा इशारा

मध्य भारतात ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

272
Unseasonal Rain
Unseasonal Rain : मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहेत. भर उन्हाळ्यात देखील अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. त्यामुळे उन्हाचा पारा देखील उंचावला आहे. अशातच मुंबईमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पुढील पाच दिवस राज्याच्या अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा (Unseasonal Rain) दिला आहे. तसेच मुंबईतही पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून दुपारनंतर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

हेही पहा

या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज व यलो अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट (Unseasonal Rain) देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ आणि छत्रपती संभाजी नगर वगळता सर्व जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३० एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

(हेही वाचा – दादरमध्ये रानडे मार्गावरील फेरीवाले पोलीस आणि महापालिकेच्या रडारवर)

राज्यासह देशभरात अवकाळीचे संकट

देशभरात पावसाची शक्यता मध्य भारतात ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची (Unseasonal Rain) शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात २ मे रोजी मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच पुढील चार दिवसांत केरळ आणि तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.