गौरी-गणपतीच्या ४३ हजार मूर्तींचे रात्री १२ पर्यंत विसर्जन

122

मुंबईत गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायांना सोमवारी सहाव्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. गौरीसह गणपती बाप्पांना मोठ्या उत्साहात वाजत गाजत गुलाल उधळत निरोप देण्यात आला. सोमवारी सकाळपासूच या विसर्जनाला सुरुवात झाली. दुपारनंतर विसर्जन स्थळी गर्दी वाढू लागली. रात्री १२ पर्यंत एकूण ३७,२१४ घरगुतीगणेशमूर्तीचे व ५५८८ गौरींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, २६९ सार्वजनिक गणेशमुर्तींचा समावेश होता. रात्री १२ वाजेपर्यंत घरगुती व सार्वजनिक सह गौरी अशा एकूण ४३,०७१ मूर्तींचे विसर्जन झाले. यातील १६,६१९ गणेश मूर्ती व गौरींचे विसर्जन कृत्रिम तलावांत झाले.

(हेही वाचा – गणेश विसर्जन मिरवणूक, सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची विशेष व्यवस्था)

मुंबईत ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला श्रीगणरायाचे आगमन झाल्यानंतर प्रथम दीड दिवसांच्या व नंतर पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी सहा दिवसांच्या अर्थात गौरी गणपतीला निरोप देण्यात आला. यासाठी गणेश भक्तांनी नैसर्गिक व कृत्रिम तलाव आदी विसर्जन स्थळी गणेश विसर्जनासाठी गर्दी केली होती. दादर, जुहू, गिरगाव आदी चौपाटीसह तलाव, खाडी या नैसर्गिक विसर्जन स्थळासह १५२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेसह पोलीस इतर संस्था आदींच्या माध्यमातून सेवा सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.

मुंबईतील समुद्र चौपट्या तसेच इतर विसर्जन स्थळांवर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सहा दिवसांच्या एकूण ३७,४८३ गणेशमूर्तीं व ५५८८ गौरींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, सार्वजनिक २६९ सार्वजनिक गणेशमूर्तींचा व ३७,२१४ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. तर कृत्रिम तलावात विसर्जित १६,६१९ गणेशमूर्तीं गौरींचे विसर्जन झाले. त्यात १२३ सार्वजनिक आणि १४,४१५ घरगुती तसेच २०४६ गौरींचा समावेश होतो

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.