परिचारिकांच्या संपामुळे सरकारी रुग्णालयांतील प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. अत्यावश्यक विभागात रुग्ण दाखल करताना रुग्णांना बराच काळ रखडवले गेल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. काहींना सोमवारी रुग्णालयात दाखल व्हायला सांगितल्याने नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या स्थानकासह कार्यशाळेत १५८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स)
शुक्रवारी झाल्या केवळ २४ अत्यावश्यक शस्त्रक्रिया
मुंब्रा, डोंबिवली येथून गुरुवार रात्रीपासून आपल्या रुग्णांना जे.जे. रुग्णालयात घेऊन आलेल्या नातेवाईकांना रुग्णालयीन कर्मचा-यांकडून चांगला अनुभव येत नसल्याची तक्रार केली जात होती. आम्ही रात्री दाखल झालो आहोत, रुग्णाला रक्तदाबाचा त्रास आहे. दुपार झाली तरीही औषध दिलेली नाही, रुग्णाच्या तब्येतीविषयी माहिती दिली जात नाही, असे डोंबिवलीहून आलेली महिला सांगत होती. मुंब्र्याहून इरफान खान (३२) या रुग्णाला मूत्रपिंडाचा संसर्ग झाल्याने सकाळीच जे.जे. रुग्णालयात दाखल करावे लागले. इरफान काही वर्षांपूर्वी खूप उंचीवरून पडला होता. त्यानंतर तो आजारीच असतो. अचानक इरफानला त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी मुंब्र्याहून जे.जे. रुग्णालय गाठले. रुग्ण दाखल करताना आमचा अनुभव चांगला नव्हता. भांडल्यानंतर रुग्णाला दाखल करुन घेतले, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. जे.जे. रुग्णालयात दिवसाला साधारणतः ८० शस्त्रक्रिया होतात. शुक्रवारी केवळ २४ अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या गेल्या.
Join Our WhatsApp Community