मलबारहिलमध्ये जलवाहिनीला गळती : नेपियन्सी रोडवरील पाणी पुरवठ्यावर परिणाम

229

मलबार हिलमधील रिट्झ रोडवर जलवाहिनीमधील व्हॉल्वमध्ये मोठ्या प्रमाणात गळती निर्माण झाली असून यामुळे या व्हॉल्व दुरुस्तीचे काम तातडीने होती घेण्यात आले आहे. त्यामुळे नेपियन्सी रोड, जे मेहता रोड, डोंगरसी रोड आदी भागांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून या भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

( हेही वाचा : दादर आग दुघर्टना : अग्निशमन दलाच्या बंबाआड फेरीवाले आणि देवी मंडप )

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार 

मलबार हिलमधील महापालिकेच्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमध्ये रिट्झ रोडवर मोठ्याप्रमाणात गळती लागल्याचे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आले. याबाबत तक्रार महापालिकेच्या डि विभागातील नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याने महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या गळती शोधक पथकाच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील भागातील पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल,असे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले.

व्हाल्व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने डोंगरसी रोड, नेपियन्सी रोड, जे मेहता रोड आदी भागांमधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून या भागांमधील नागरिकांनी जलवाहिनी दुरुस्ती होईपर्यंत पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.