कर्ज घेताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

93

कोणतेही कर्ज घेताना किंवा गृहकर्ज घेण्यापूर्वी केवळ व्याजदर यासह किती ईएमआय द्यावा लागतो हे जाणून घेणे पुरेसे नाही. तर कर्जाची परतफेड प्रक्रियेस बराच काळ लागतो, त्यामुळे गृहकर्ज घेताना खालील काही मुद्दे जाणून घेणे आवश्यक आहे. साधारणपणे बँका कर्जदाराचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, परतफेडीची क्षमता यासह अनेक बाबींचा विचार करून गृहकर्ज मंजूर केले जाते. इतकेच नाही तर तुम्ही बँकानी ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता केली नाही तर तुमचा गृहकर्ज अर्ज नाकारला जाऊ शकतो.

(हेही वाचा – मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील, गुवाहाटीला रवाना)

किती कर्ज घेतले पाहिजे

बँका कर्ज देताना अर्जदार परतफेड करू शकतात का? याचाही विचार करतात. तुम्हाला किती कर्जाची गरज किती आहे, तुम्ही ईएमआय किती देऊ शकता याचा विचार करून कर्ज घ्या. तुमचा ईएमआय तुमच्या पगाराच्या ४० टक्केपेक्षा जास्त नसला पाहिजे, असेही बँकांकडून आवर्जून सांगितले जाते.

डाऊन पेमेंट करण्याचे फायदे

जास्त डाऊन पेमेंट क्रेडिट रिस्क कमी करते. डाऊन पेमेंट केल्याने कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते. ज्या कर्जदारांना त्यांचे व्याज खर्च कमी करून हवे आहे, त्यांनी गृहकर्जाच्या डाऊन पेमेंटसाठी अधिक रक्कम भरणे जास्त सोयिस्कर ठरते.

तुमचे ईएमआय राखून ठेवा

काहीवेळा नोकरी गमावल्यामुळे किंवा इतर कोणत्या परिस्थितीमुळे तुमच्या उत्पन्नावर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला कर्ज फेडण्यात अडचणी येऊ शकतात. दंड आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्येही घट होऊ शकते. त्यामुळे, तुमच्या आपत्कालीन निधीमध्ये किमान सहा महिन्यांसाठी अंदाजे गृहकर्जाचे ईएमआयचे हप्ते शिल्लक ठेवणं आवश्यक असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.