पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तोशखाना घोटाळ्याप्रकरणी बुधवारी रावळपिंडी येथे विशेष न्यायालयाकडून कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, तोशाखाना प्रकरणी, या घोटाळ्याप्रकरणी बुशरा बीबी यांना १४ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
विशेष न्यायालयाकडून या दाम्पत्याला १.५७३ अब्ज रुपयांचा दंड आणि माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इमरान खान यांना १० वर्षांकरिता कोणत्याही सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवले आहे.
(हेही वाचा – BMC Budget २०२४-२५ : महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या शुक्रवारी २ जानेवारीला; यंदाचा अर्थसंकल्प तुटीच्या आसपास )
१४ वर्षांची शिक्षा आणि ७८ कोटीं रुपयांचा दंड
विशेष न्यायालयाकडून ७८.७० कोटी रुपये दंड आणि या दाम्पत्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. १५८.३० अब्ज डॉलर्सदेखील आकारण्यात आले होते. तोशखाना प्रकरणातील विशेष न्यायालयाचा निकाल बुधवारी, सार्वत्रिक निवडणुकांच्या फक्त ८ दिवस आधी आला. विशेष न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी बुधवारी हा निकाल दिला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान इम्रान खानला न्यायालयात आणण्यात आले, मात्र बुशरा बीबी हजर झाली नाही. न्यायालयाने पीटीआयच्या संस्थापकाला हजर राहण्याचे समन्स बजावले आणि त्यांचे 342 जबाब कुठे आहेत, असे विचारले. त्यावेळी इम्रान खानने, “निवेदन खोलीत आहे, मला फक्त न्यायालयात हजर राहण्यासाठी बोलावण्यात आले होते. न्यायाधीशांनी इम्रान खान यांना त्यांचे निवेदन त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले आणि यावर “न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका.” , अशी टिप्पणीही केली आहे.
इमरान खान यांचा न्यायाधीशांना प्रश्न …
इम्रान खान यांनी न्यायाधीशांना ‘आपण जफर प्रकरणात घाईघाईने शिक्षा सुनावली असल्याचे म्हटले आहे. “वकील अद्याप आलेले नाहीत, त्यांना दाखवल्यानंतर मी निवेदन सादर करेन”, असेही त्यांनी न्यायाधीशांना सांगून ते कोर्टरूममधून बाहेर पडले. मंगळवारी, इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्याविरोधातील तोशखाना खटल्याची सुनावणी पीठासीन न्यायाधीश मुहम्मद बशीर आजारी पडल्याने आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तहकूब करण्यात आली. कारवाईदरम्यान बुशरा बीबीचे विधान फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीपीसी) कलम 342 अंतर्गत नोंदवले गेले, परंतु खान यांचे विधान पुढील सुनावणीसाठी पुढे ढकलण्यात आले. बचाव पथक त्यावेळी साक्षीदारांची यादी सादर करण्याचीही योजना आखत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community