एसटी महामंडळात कर्तव्य बजावताना अपंगत्व आले तरी नोकरीची चिंता नाही!

166

राज्य परिवहन महामंडळात सेवेत असताना किंवा कर्तव्य बजावतांना अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त न करता महामंडळ त्यांचा सांभाळ करणार आहे. कर्तव्य बजावतांना अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या करण्यायोग्य नोकरी जर महामंडळात नसेल तर महामंडळ त्यांना अनुकंपातत्वावर सेवेत सहभागी करून घेणार आहे. ज्या एसटी कर्मचाऱ्याला अपंगत्व आलेले आहे, अशा कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि अपंगत्वाचा दाखला यांची पूर्तता चार आठवड्यांच्या मुदतीत करून घेण्यात येणार असून अपंग कर्मचाऱ्यांनी दाखला सादर केल्यानंतर साधारण 2 आठवड्यात त्यांना पर्यायी नोकरी देण्यात येणार आहे.

(हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांना कोरोना; ट्विटवर आवाहन करत म्हणाले, सर्वांनी काळजी घ्या!)

महामंडळ त्यांना पर्यायी नोकरी देणार

सेवेत असताना अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, अपंगत्व आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची सत्तता पडताळून तसेच खातरजमा करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याच्या दिनांकापासून दोन आठवड्यांच्या मुदतीत करण्यात यावी, असे आदेश महामंडळाने सर्व विभागासाठी काढले आहेत. अपंगत्वाच्या दाखल्याची खातरजमा केल्यानंतर हा दाखला योग्य आढळून आल्यास एसटी परिवहन महामंडळ त्यांना पर्यायी नोकरी देणार असल्याचे सांगितले जात आहे.

महामंडळ अखेरपर्यंत वेतनाची व्यवस्था करणार

विकास केंग व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व राज्य परिवहन महामंडळ या रिट याचिका क्र. 9762/2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सुधारीत आदेश महामंडळाने काढले असून जे कर्मचारी वैद्यकीयदृष्ट्या कोणतेही काम करण्यास अपात्र असतील किंवा समकक्ष पद उपलब्ध नसेल तर त्यांची नियुक्ती अधिसंख्य पदावर होणार आहे. या पदांमुळे त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्त वेतन, पीएफ आणि इतर फायदे जरी मिळणार नसले तरी त्यांचे वेतन अखेरपर्यंत त्यांना मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.