देशभरात दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळत असून अमेरिकेतही भारतीयांनी दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला. भारतीय अमेरिकन लोकांना दिवाळीनिमित्त व्हाईट हाऊसमध्ये उत्साह पाहायला मिळाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बिडेन यांनी आजवरचा सर्वात मोठा दिवाळी उत्सव आयोजित केला होता. शासकीय निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलवरून या सोहळ्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Solar Eclipse: मुंबई,पुण्यासह राज्यातील ‘या’ शहरांत केव्हा आणि किती वेळ दिसणार ग्रहण? वाचा)
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, भारतीय-अमेरिकनांचे यजमानपद भूषवण्याचा आम्हाला सन्मान वाटतो. दिवाळी उत्सव आनंदाचा एक भाग बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानू इच्छितो. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. दरम्यान, आशियातील विशेषत: भारतीय लोकांमुळेच अमेरिका वेगाने प्रगती करत असल्याचे जिल बिडेन यांनी म्हटले आहे. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की, बिडेन सरकार त्यांच्या हितासाठी सदैव काम करत राहील. या दिवाळीमुळे आज तुम्हाला या व्हाईट हाऊसमध्ये सामर्थ्य आणि विश्वासाने, प्रेमाने आणले आहे, याबद्दल कृतज्ञ असल्याचे जिल बिडेन यांनी म्हटले आहे.
In celebration of the Festival of Lights, President Biden and the First Lady hosted a Diwali reception at the White House. pic.twitter.com/3kGqCgEebK
— The White House (@WhiteHouse) October 25, 2022
राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी दिवाळी साजरी आनंददायी केल्याबद्दल अमेरिकेतील आशियाई अमेरिकन समुदायाचेही आभार मानले. हे सर्व आता अमेरिकन संस्कृतीचा भाग आहे. ते म्हणाले की, व्हाईट हाऊसमध्ये आम्ही अधिकृतपणे दिवाळी रिसेप्शनचे आयोजन करत असल्याने आमचा सन्मान होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने लोकांना दिव्याच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या.
बघा व्हिडिओ
Join Our WhatsApp CommunityTo everyone celebrating the Festival of Lights here in the United States and around the world, happy Diwali! pic.twitter.com/0DPlOaqhMO
— Vice President Kamala Harris (@VP) October 24, 2022