डोंबिवलीतील जवळच्या दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात धक्कादायक घटना घडली. घरातल्या सोफा सेटमध्ये महिलेचा मृतदेह आढळून, आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
नव-याची पोलिसांत धाव
डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे हे मंगळवारी सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी साडेबारा वाजता शाळेत गेला होता. संध्याकाळी किशोर हे कामावरुन घरी परतले. पत्नी घरात नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला. ती कुठेही आढळून आली नाही. मित्र मंडळी नातेवाईकांसह सगळीकडे विचारपूस केली होती. तरी कुठे गेली आहे हे समजून आले नाही. याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक घरात आले. किशोर हे पत्नी हरवल्याची नोंद करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचले होते.
( हेही वाचा :“खोटं, बेशरमपणे बोलणं, रोज उठल्यानंतर आपलं गटार उघडायचं हे राऊतांचे धंदे” )
का आणि कशासाठी हत्या
घरात दररोज येणा-या शेजा-यांना सोफा अस्ताव्यस्त दिसून आल्यावर, त्यांनी तो सोफा चाचपला. त्यावेळीच त्यांना धक्का बसला. सुप्रिया हिचा मृतदेह सोफ्यात कोंबून ठेवला होता. सुप्रियाची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शेखर बागडे पोलीस निरीक्षक अनिल पडवळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुप्रिया हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे. अखेर तिची हत्या कोणी व कशा करता केली. तिच्यासोबत काही गैरप्रकार झाला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन, पोलीस विचारपूस सुरु आहे.
Join Our WhatsApp Community