चला…आता नवी मुंबईकरांचीही प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवसापासून धावणार मेट्रो

मागच्या ब-याच वर्षांपासून नवी मुंबईचे चाललेले मेट्रोचे काम अखेर पूर्ण झाले आहे. रेल्वे मंत्रालयाचे मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त 17 जानेवारी रोजी नवी मुंबई मेट्रोची पाहणी करणार आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी मंजुरी देण्यासाठी मेट्रोची पाहणी करण्याचा हा अंतिम टप्पा असणार आहे, असे अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे.

महा मेट्रोची नियुक्ती

नवी मुंबईच्या मेट्रोचे काम 2011मध्ये सुरु करण्यात आले होते. पण अनेक कारणांमुळे कामाला विलंब होत राहिला. त्यामुळे आता कामामध्ये गती निर्माण करण्यासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, रेल्वे यंत्रणा उभारणीसाठी नोडल एजन्सी महा मेट्रोची नियुक्ती करत आहे. या महामंडळ प्रकल्पांतर्गत 4 प्रगत काॅरिडोअरची निर्मिती करण्यात येणार आहे.

( हेही वाचा :आता गाडीचा चक्काचूर झाला, तरी तुम्ही वाचणार! )

…तर धावणार मेट्रो

2021च्या मे महिन्यात, बेलापूर ते पेंडार दरम्यान 11.1 किमी लांबीच्या लाईन एक वर अकरा स्थानकांदरम्यान तसेच तळोजा येथील डेपोमध्ये मेट्रोची ट्रायल घेण्यात आली होती. पेंडार आणि सेंट्रल पार्क स्थानकांदरम्यान 5.14 किमी अंतर कापणाऱ्या चार स्थानकांना संशोधन डिझाइन आणि स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशनकडून अंतरिम गती  प्रमाणपत्र देण्यात आले. याआधी मेट्रोसाठी डिसेंबर 2021 ही तारीख देण्यात आली होती. पण काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. त्यामुळे आता या अंतिम टप्प्यात तरी रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळेल, असं सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here