झिरो स्क्रॅप मिशनमधून मध्य रेल्वे कोटीत

एप्रिल आणि मे २०२२ या केवळ दोन महिन्यांमध्ये भंगाराच्या विल्हेवाटीतून तब्बल ५७.२९ कोटी रुपयांचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला आहे. मागील वर्षी एप्रिल ते मे २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या ९.२१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. जो यंदा मागील वर्षाच्या तुलनेत ५२२.०४ टक्के अधिक आहे.
मध्य रेल्वेने प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड ही भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.  या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, भंगार (वापरात नसलेले) डबे, वॅगन आणि लोकोमोटिव्ह इत्यादींचा समावेश आहे. शून्य स्क्रॅप मिशन” चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या सर्व विभाग, कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे.

मागच्या वर्षाच्या तुलनेत अधिक महसूल

चालू वर्षात एप्रिल ते मे २०२२ या दोन महिन्यांत, मध्य रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून ५७.२९ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे. जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत म्हणजेच एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत झालेल्या ९.२१ कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत ५२२.०४ टक्के अधिक आहे. मध्य रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५३०.३४ कोटी रुपयांचे महसूल प्राप्त केले आहे, जे कोणत्याही आर्थिक वर्षात भंगाराच्या विक्रीतून मिळालेला सर्वाधिक महसूल होता.
भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळत नाही, तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. –अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here