कांदिवलीच्या समतानगरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या ‘एकदुजे के लिए’

मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रेमी युगुलाने डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांच्या प्रेम प्रकरणाला घरातल्यांचा विरोध असल्यानेच दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील मृत तरुणी ही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कांदिवली पूर्व जानुपाडा परिसरात मृत तरुण आकाश जाठे (२१) हा राहात असून तो घरकाम करायचा. त्याच्या शेजारीत मृतअल्पवयीन तरुणी राहात होती. मागील अनेक दिवसांपासून दोघांमध्ये प्रेमसंबध होते. मात्र त्यांच्या या नात्याला घरातल्यांचा विरोध होता. दरम्यान, शुक्रवारी पहाटे तरुणी घरी नसल्याचे पाहून घरातले तिचा शोध घेत होते. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केला. मुलीने तिचा मोबाइल घरीच ठेवला होता. त्यामुळे संशियत  मुलाबाबत चौकशी केली असता, तोही घरातून निघून गेल्याचे कळाले.

( हेही वाचा: ‘श्रीमान पोपटलाल’, असा उल्लेख करत राऊतांनी सोमय्यांना डिवचले; पण नेटक-यांकडून झाले ट्रोल )

मुलाचे मोबाइल लोकेशन ट्रेस केले असता, ते पाठाचे पाणी या आदीवासी पाड्याजवळ असलेल्या खदानी परिसरात दाखवत असल्याने पोलिसांनी तिथे शोध मोहिम राबवली. त्यावेळी दोघांचे मृतदेह पोलिसांना आढळून आले. मुलाच्या मोबाइलमध्ये त्याने आईला पाठवलेले मेसेज पोलिसांनी पाहिले. त्यात ‘आम्ही जात आहोत, परत येणार नाहीत. काळजी घ्या’ असा मेसेज होता. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकिय रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी समतानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here