हिजाब हा मुस्लिम धर्माचा अविभाज्य भाग नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हिजाबचा आग्रह धरू नये. तसेच शालेय नियमांचे पालन करावे असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. या निकालाच्या विरोधात स्थानिक मुस्लिम विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार ? )
एकूण 35 विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडले
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणावर निकाल दिल्यानंतर अवघ्या काही तासांनंतर, कर्नाटकातील यादगीर येथील विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. विद्यार्थ्यांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते पण त्यांनी नकार दिला आणि परीक्षा हॉलमधून बाहेर पडले. एकूण 35 विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडले, अशी माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात 27 डिसेंबर 2021 रोजी हिजाबवरून वाद सुरू झाला होता. हिजाब घालून आलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला.
परवानगी दिली जाणार नाही
कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता, त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले होते. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. तसेच सहा विद्यार्थीनींनी याप्रकरणी हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, गणवेशास प्राधान्य देत हायकोर्टाने या विद्यार्थीनींची याचिका फेटाळून लावली आहे.
Join Our WhatsApp Community