मुंबईत सव्वा महिन्यात पावसाने घेतला ३३ जणांचा बळी

117

मुंबईत मागील ९ जूनपासून पावसाळा सुरू झाल्यानंतर विविध प्रकारच्या एकूण १०२७ दुर्घटनांमध्ये तब्बल ३३ जणांचे बळी गेले आहे. तर त्यांच्या दुप्पट अर्थात ६७ जण जखमी झाले आहेत. यामध्ये चुनाभट्टी येथील अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारत दुर्घटनेचा समावेश असून या एकाच दुघर्टनेत १९ रहिवाशांचा मृत्यू झाला होता आणि १४ जखमी झाले होते.

( हेही वाचा : राज्यात पालघर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोलीला पूराचा धोका)

मुंबईत पावसाळा सुरु झाल्यानंतर इमारती तसेच घर कोसळणे, दरड कोसळणे, झाडांच्या फांद्या तसेच झाडे पडून दुघर्टना होणे यासह शॉक सर्कीट आणि समुद्र तथा तलावांमध्ये बुडणे अशाप्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत. मागील १ जून ते ७ जुलै या सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये मुंबईत इमारती व घरे पडण्याच्या अशा एकूण ११४ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, २३ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जण जखमी झाले आहेत. दरड कोसळण्याच्या १३ घटनांमध्ये ५ जण जखमी झाले आहे. मुंबईत मृतावस्थेतील झाडे आणि झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्यात आल्याचा दावा केला असला तरीही सव्वा महिन्यात अशा ५२७ घटना घडल्या आणि यामध्ये ११ जण जखमी झाले आहेत. समुद्र,नदी,खाडी आदींमध्ये बुडण्याच्या सात घटना घडल्या असून त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर विजेचा धक्का लागण्याच्या १३ घटनांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहेत. तर संपूर्ण मुंबईत शॉटसर्कीटच्या ३२५ घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

प्रमुख दुर्घटना

  • १४ जून रोजी जुहू चौपाटी येथे समुद्रात बुडून ३ जण मृत
  • १९ जून रोजी चेंबूर वाशी नाका येथे २ जण जखमी
  • २३ जून रोजी चेंबूर येथे गारमेंटचा भाग कोसळून १२ जण जखमी
  • २७ जून रोजी दादर येथे झाड पडून २ वाहनांचे नुकसान
  • २८ जून रोजी कुर्ला येथे इमारत दुर्घटनेत १९ जण मृत तर १४ जण जखमी
  • ४ जुलै रोजी कुर्ला, होमगार्ड कार्यालयाजवळ संरक्षक भिंत कोसळून ५ घरांचे नुकसान
  • ५ जुलै रोजी दहिसर येथे खदानीत बुडून २ जणांचा मृत्यू
  • ६ जुलै रोजी चुनाभट्टी येथे घरांवर दरड कोसळून ३ जण जखमी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.