मुंबईत झाडांच्या फांद्या छाटणीचे ९० टक्के काम पूर्ण

107

मुंबईत पावसाळ्यापूर्व करण्यात येणाऱ्या धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणीचे काम आतापर्यंत ९० टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मुंबईत आतापर्यंत ८९ हजार २३० झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहे. अजूनही १४ हजार८४० झाडांच्या फांद्यांची छाटणीचे काम शिल्लक असून पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : पगारवाढ टप्याटप्प्याने? आरोग्यसेविकांच्या मागण्यांवर पालिकेचा प्रस्ताव)

मुंबईत रस्त्यालगत १ लाख ९२ हजार ५५९ एवढी झाडे असून त्यातील १ लाख ५४ हजार १९३ झाडांचा सर्वे करण्यात आले. त्यातील १ लाख ०४ हजार ७०झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याची गरज असून त्यातील आतापर्यंत ८९ हजार २३० झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत.

मुंबईतील या रस्त्यालगतच्या सर्वे करण्यात आलेल्या झाडांमध्ये ५२३ झाडे ही मृत आढळून आली होती, त्यातील ५१२ झाडे ही तोडण्यात आल्याची माहिती उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक बोरीवली (६२००), वडाळा,शिवडी (६१०२), मालाड (५९९५), घाटकोपर(५८१६), अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम (५२८५), गोरेगाव (५२५६) आदी भागांमध्ये सर्वांधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी झाली आहे.

मुंबईतील खासगी सोसायट्यांना नोटीस

मुंबईतील खासगी आणि सरकारी वसाहतींच्या हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याच्यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने नोटीस बजावण्यात आली. यामध्ये संपूर्ण मुंबईतील ९४८८ सोसायट्यांना महापालिकेच्यावतीने नोटीस बजावण्यात आली. यापैंकी ६० टक्के सोसायट्यांनी अर्ज करून आपल्या परिसरातील झाडांच्या फांद्या छाटण्याचा प्रयत्न केला असून उर्वरीत झाडांच्या फांद्यांची छाटणीही ८ ते १० दिवसांत होईल,असा विश्वास परदेशी यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.