महापालिका रुग्णालयांमधील कपड्यांची धुलाई आता अत्याधुनिक टनेल लाँड्रीत!

199

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील रुग्णांचे तसेच डॉक्टरांचे कपडे धुण्यासाठी टनेल धुलाई केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रति पाळीमध्ये ३० हजार कपडयांची शास्त्रोक्त धुलाई करण्यात येणाऱ्या या टनेल धुलाई केंद्राची अर्थात टनेल लाँड्रीची उभारणी महापालिका स्वत: करत असल्याने मुंबईसह देशात अशाप्रकारे केंद्र उभारणारी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका ठरणार आहे.

अत्याधुनिक टनेल धुलाई केंद्र उभारणार

रुग्णालयांमध्ये वापरलेले कपडे धुण्यासाठी महापालिकेचे स्वत:चे विद्युत धुलाई केंद्र परेल येथे आहे. परंतु याठिकाणी सध्या ५० टक्के कपडे धुतले जात असून उर्वरीत ५० टक्के कपडे हे खासगी लाँड्रीमधून धुवून घेतले जातात. या विद्युत धुलाई केंद्राची जुन्या यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली असल्याने प्रति पाळी ३० हजार कपड्यांची शास्त्रोक्त पध्दतीने धुलाई करण्याची क्षमता अत्याधुनिक टनेल धुलाई केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत याकरता ३२.८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

( हेही वाचा: किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, पिता- पुत्रांच्या अडचणीत वाढ! )

या रुग्णालयांचे कपडे धुतले जाणार

महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमधून सुमारे ४० हजार कपड्यांची धुलाई केली जाते. सध्या अशाप्रकारची यंत्रणा रेल्वे कडे आहे, परंतु त्यांनी ती भाडेतत्वावर सेवा घेतली आहे. परंतु महापालिकेच्यावतीने यासाठी सुमारे १६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मुंबईतील केईएम,शीव, नायर आणि कुपर या चार प्रमुख रुग्णालयांमधील रुग्णांचे, डॉक्टर तसेच इतर रुग्णालयीन कपडे हे या अत्याधुनिक टनेल धुलाई केंद्रात धुतले जाणार आहे. या चार प्रमुख रुग्णलयांमधील कपड्यांचा भार या टनेल धुलाई केंद्रावर सोपवून उर्वरीत रुग्णालयातील कपडे हे महापालिकेच्या परळ येथील विद्युत धुलाई केंद्रात धुतले जाण्याचा विचार आहे.  यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबतची निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. मात्र टनेल लाँड्री ही अत्याधुनिक असून यामध्ये प्रत्येक कपड्यांचे निजंर्तुकीकरण करत शास्त्रोक्तपणे धुलाई केली जाते,असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.