नांदेडमधील मुखेड तालुक्यात दापका राजा ते हिप्परगा या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आल्याने कारसह एक व्यक्ती वाहून गेली आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव अझहर सत्तार शेख असे असून या गाडीतील इतर चार जण काच फोडून बाहेर आल्याने बचावले आहेत.
( हेही वाचा : IRCTC Booking : आता चॅटबॉटद्वारे करता येणार रेल्वे तिकिटांचे बुकिंग )
कार दापकाराजा पुलावरून खाली कोसळली
अहमदपूर तालुक्याच्या हाडोळती येथील ५ तरूण नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमावरून घरी जात असताना सोमवारी रात्री ९ वाजता या तरुणांची कार ( एमएच-१४, बीआर ३०२१) दापकाराजा पुलावरून खाली कोसळली. यानंतर कारमध्ये बसलेल्या चार जणांनी गाडीच्या काचा फोडून बाहेर उडी घेतली आणि स्वत:चा जीव वाचवला मात्र कारचा चालक अद्याप बेपत्ता आहे, अशी माहिती मिळाली आहे.
बेपत्ता कारचालकाचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलीस, स्थानिक नागरिक, तहसीलच्या पथकांनी तसेच रेस्क्यू टीमने मंगळवारी पहाटे अपघातग्रस्त कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. सध्या बेपत्ता कारचालकाचा शोध सुरू आहे.
Join Our WhatsApp Community