बाल आश्रम की छळछावणी, ४५ मुलांची सुखरूप सुटका

138
नवीमुंबईतील सिवुड या ठिकाणी आश्रमशाळेच्या नावाखाली लहान मुलांचा छळ करण्यात येत होता. या मुलांना कधी शिळं अन्न, तर कधी अस्वच्छेतेत ठेवण्यात येत होते. त्याहून भयानक म्हणजे आश्रमशाळा चालवणारा मुलींच्या शरीराला वेपोरब लावून त्यांचा विनयभंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार बाल संरक्षण विभागाने केलेल्या कारवाईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी एनआयआर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आश्रमशाळा चालवणा-याला अटक करण्यात आली आहे.
ठाणे जिल्हा बाल संरक्षण विभागाने बेकायदेशीररित्या चालवण्यात येणाऱ्या या आश्रमशाळेवर कारवाई करून ३ ते १८ वयोगटाच्या आतील ४५ मुलांची सुटका केली आहे. राजकुमार येशुदानसन हा नवी मुंबईतील सी-वुड या ठिकाणी ‘बेथेल गोप्सेल’ नावाची बेकायदेशीर आश्रमशाळा चालवत होता. या आश्रम शाळेत वृद्ध महिला आणि ३ ते १८ वयोगटातील मुलांना ठेवण्यात आले होते.

वेपोरब लावण्याच्या नावाखाली  मुलींचा विनयभंग 

ठाणे जिल्हा बाल संरक्षण विभागाकडे या आश्रम शाळेबाबत लेखी तक्रार दाखल झाल्यानंतर, ठाणे जिल्हा बाल संरक्षण विभागाने या आश्रम शाळेची पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या आश्रमात अस्वच्छता होती. तसेच मुलांना शिळं अन्न दिले जात होते. त्याचबरोबर येथील मुलींच्या शरीराला राजकुमार येशुदानसन हा वेपोरब लावण्याच्या नावाखाली  त्यांचा विनयभंग करत असल्याची तक्रार येथील १४ वर्षाच्या मुलीने केली आहे.

आरोपी अटकेत 

या मुलांना महाराष्ट्रातील चर्च तसेच राजस्थान, ओडिशा, तामिळनाडू येथून नवी मुंबईत आणण्यात आले होते. चर्चच्या मालकाचा दावा आहे की, मुलांना त्यांच्याच पालकांनी पाठवले होते”  बालकल्याण समितीने येथील आश्रमातून ४५ मुला-मुलींची सुटका केली आहे. बाल कल्याण समितीच्या अधिकार्‍यांना असेही आढळून आले की, चर्चकडे आश्रम  चालवण्यासाठी  कुठलीही मान्यता नव्हती. त्यासाठी कोणत्याही परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. मुलांचा पत्ता नमूद करणारी साधी नोंदही ठेवली जात नव्हती. या प्रकरणी बाल कल्याण समितीने एनआयआर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून राजकुमार येशुदानसनला अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.